

Political Banners In Mumbai
ESakal
मुंबई : नवरात्र आणि गणेशोत्सवाच्या काळात शहरात ठिकठिकाणी लावलेले धार्मिक बॅनर, पोस्टर अजूनही पूर्णपणे उतरलेले नाहीत. तोच आता पुन्हा मुंबई राजकीय बॅनर्स आणि पोस्टरांनी गच्च भरली आहे. या सर्व प्रकाराकडे पालिका प्रशासनाने डोळेझाक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार दिलेल्या सूचना आणि इशाऱ्यानंतरही शहरात अवैधरित्या बॅनर–पोस्टर लावण्याचे प्रकार थांबलेले नाही.