
शहापूर : सरकारी अधिकारी व कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाल्याचा आरोप करीत खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या नुकत्याच दाखल केलेल्या जनहित याचिकेवर प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस पाठवित पुढील सुनावणी १ ऑगस्टला ठेवली आहे.