

Flies and Cockroaches Found in NSCI Club Kitchen; FDA Suspends Food Licence
eSakal
Mumbai NSCI Club Food Licence Suspended: मुंबईतील प्रसिद्ध नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) च्या किचनमध्ये अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत मुख्य किचनमध्ये माशा, तर वॉशबेसिन परिसरात झुरळे आढळली. या प्रकरणी FDAने २३ नोव्हेंबरपासून क्लबचा खाद्य परवाना तात्काळ निलंबित केला आहे.