esakal | Mumbai: राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय - नवाब मलिक
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक

राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय - नवाब मलिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झालाय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे.

हेही वाचा: मलिक, प्रसारमाध्यमांविरुद्ध मुंबै बँकेचा हजार कोटींचा दावा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झालाय यात कुणाचं दुमत नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

loading image
go to top