Mumbai : हॉटेल व्यावसायिकाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याचा विनयभंग

पीडितेसोबत झालेल्या वादानंतर आरोपीने घरातील पार्टीत तिच्यावर बेदम मारहाण केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
mumbai ncp woman  alleged complaint  party  argument victim
mumbai ncp woman alleged complaint party argument victimsakal

मुंबई - एन एम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गोवा आणि मुंबईस्थित हॉटेल व्यावसायिक विपिन कुमार सिंग यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्ता असलेल्या सोशल मीडिया प्रभावकर्त्याचा विनयभंग आणि मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेसोबत झालेल्या वादानंतर आरोपीने घरातील पार्टीत तिच्यावर बेदम मारहाण केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी कारवाई केली नाही, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे . हॉटेल व्यावसायिक विपिन कुमार सिंग आता फरार असून एन एम जोशी मार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com