मुंबईत कोविडच्या ३२३ नवीन रुग्णांचे निदान, तर ७ रुग्णांचा मृत्यू

corona
coronasakal media

मुंबई : आज 323 नवीन रुग्ण (New corona patient) सापडले. कोरोनाग्रस्तांची Corona patients Mumbai) एकूण संख्या 7,34,435 इतकी झाली आहे. आज 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली (Corona free patients) असून आतापर्यंत 7,11,073 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 32,285 कोविड चाचण्या (corona test) करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 81,18,437 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. (Mumbai new corona patients details seven deaths today-nss91)

 मुंबईत आज दिवसभरात केवळ 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 880 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 5 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पुरुष तर 2 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटा दरम्यानचा तर इतर 4 रुग्णांचे वय 60 वर्षाच्या वर होते.

corona
पूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेचा आराखडा तयार करा, उर्जामंत्र्यांचे निर्देश

रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,434 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.5 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 5,082 हजारांवर आला आहे. मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या संख्या 3 पर्यंत खाली आली. सीलबंद इमारतींची संख्या 55 झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,287 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 832 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com