
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची निवृत्त झाले असून देवेन भारती हे नवे पोलिस आयुक्त असतील. देवेन भारती यांनी मुंबई व परिसरात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. नवीन आयुक्तांच्या निवडीसाठी अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात देवेन भारती यांचे नाव आघाडीवर होते. ते १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत सध्या पोलिस मुख्यालयात विशेष पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.