

Mumbai Introduces New Traffic Rules For Heavy Vehicles
Esakal
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी १ फेब्रुवारीपासून शहरात नवी वाहतूक नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अवजड वाहनांच्या मुंबईतील प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नव्या वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार, सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.