

Kurla station Elevated railway project
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : कुर्ला रेल्वेस्थानक परिसरातील उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. काही वर्षांपासून जमीन आणि जागेच्या अडचणींमुळे ठप्प झालेले काम आता पुन्हा सुरू होत आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४१० मीटर लांबीचा रॅम्प बांधकामासाठी तयार असून दोन्ही बाजूंची जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली आहे. या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण उन्नत रेल्वेमार्गाचा आराखडा वेगाने आकार घेईल.