

CM Devendra Fadnavis
sakal
मुंबई : महाराष्ट्र आता सागरी व्यापार, उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात देशाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथील नेस्को येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक़ -२०२५ दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल ५५ हजार ९६९ कोटी रुपयांच्या १५ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.