93 च्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

अबू सालेम, डोसासह सात जणांना शिक्षा होणार?
मुंबई - मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील खटला ब चा निकाल आज लागण्याची शक्‍यता आहे. गॅंगस्टार अबू सालेमसह मुस्तफा डोसा, अब्दुल कय्युम, शेख फिरोज खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दिकी आणि करीमुल्ला शेख यांच्याबाबत विशेष टाडा न्यायालय आज निकाल देणार आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील पहिले प्रकरण ए चा निकाल यापूर्वी लागला असून त्यातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै 2015 मध्ये फाशी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यातील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी 100 आरोपींवरील खटला पूर्ण केला. त्यानंतर या सात जणांवर खटला चालवला. मुंबई बॉम्बस्फोटाची केस बी म्हणून सात जणांवरील खटला चालवण्यात येत आहे.

अबू सालेमला पोर्तुगालमधून प्रत्यार्पित करण्यात आले; तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आले. मात्र पोलिसांनी अटक केली नसून तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा मुस्तफा डोसा याने केला आहे. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, अभिनेता आणि 93 च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरवल्याचा आरोप अबू सालेमवर आहे; तर संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर आहे. याच प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्तफा डोसावर बॉम्बस्फोट करण्यासाठीचा कट रचल्याचा व त्यासाठी नियोजित स्थळी शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे; तर ताहीरवर या प्रकरणातील अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप आहे.

Web Title: mumbai news 1993 bomb blast today result