मुंबईत शौचालय दुरुस्तीत 214 कोटींचा गैरव्यवहार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

अनिल गलगली यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई - शौचालय ब्लॉक दुरुस्तीच्या कामात 214 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. त्याविषयी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.

मुंबई महापालिका आणि म्हाडाने एकाच शौचालयाच्या दुरुस्तीवर खर्च केला आहे. गलगली यांनी पालिकेच्या "एसडब्ल्यूएम' विभागातील ही माहिती मिळवली आहे. या विभागाने अहवाल तयार करून आवश्‍यक कार्यवाहीसाठी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पाठवला होता. नवीन आसनबांधणीची किंमत 1 लाख 78 हजार असताना शौचालयातील आसने 3 ते 10 लाखांच्या दराने दुरुस्त केल्याची माहिती अहवालात आहे. म्हाडाने दुरुस्ती केलेल्या मुंबईतील शौचालयांची गुणवत्ता सुधारलेली नाही.

प्रामुख्याने मुंबई महापालिकेतर्फे स्वच्छतेवर केल्या जाणाऱ्या खर्चात भ्रष्टाचार झाल्यामुळे मुंबईचे "स्वच्छ भारत रॅंकिंग' 10 वरून 29 वर घसरल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनिल गलगली यांनी फडणवीस यांना पत्र पाठवून एक वर्षाच्या "दोष उत्तरदायित्व' कालावधीतील प्रभाग कार्यालयातील सर्व कामांची चौकशी करण्याचे आणि 10 हजार शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी मुंबई महापालिकेत "शौचालय नियामक प्राधिकरण' स्थापन करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

Web Title: mumbai news 214 crore scam in toilet repairing