पेंग्विनमुळे पालिकेला 22 लाखांचा बोनस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - दिवाळी सुटीत पेंग्विनने मुंबई महापालिकेला बोनस मिळवून दिला आहे. दिवाळीच्या चार दिवसांत भायखळ्याच्या राणीच्या बागेला 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. महिनाअखेरपर्यंत 60 ते 70 लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे.

राणीच्या बागेत गेल्या वर्षी पेंग्विन आले. त्यांच्यामुळे तेथील प्रवेशशुल्क पाच रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले. त्यालाही जोरदार विरोध झाला. तरीही पेंग्विनचा भाव कमी झाला नाही. राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी सुटीच्या दिवशी सुमारे दहा हजार पर्यटक येतात. मात्र, दिवाळीच्या चार दिवसांत 20 हजार पर्यटक आले. त्यातून पालिकेला 22 लाख रुपये उत्पन्न मिळाले.

राणीच्या बागेचे उत्पन्न
महिना- पर्यटकांची संख्या- मासिक उत्पन्न

ऑगस्ट-- 76 हजार 944---34 लाख 15 हजार 110
सप्टेंबर -- 92 हजार 908---40 लाख 72 हजार 345

Web Title: mumbai news 22 lakh profit by penguin