सात मेट्रो प्रकल्पांसाठी 4700 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 2018-19 या आर्थिक वर्षाचा 12 हजार 157 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी "एमएमआरडीए'च्या बैठकीत सादर करण्यात आला. अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिका, एमटीएचएल, उड्डाण पूल, खाडी पूल आणि रस्ते, महानगर प्रदेशाच्या विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. शहरातील सात मेट्रो प्रकल्पांसाठी चार हजार 700 कोटींची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Web Title: mumbai news 4700 crore to metro project