नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी 80 अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी अखेरची तारीख होती. राज्यभरातून सायंकाळी साडेसातपर्यंत सुमारे 80 अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष मोहन जोशी यांचाही समावेश आहे.

परिषदेच्या 2013-18च्या निवडणुकीत मोहन जोशी पॅनेलविरुद्ध विनय आपटे पॅनेल अशी लढत झाली होती. त्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्यामुळे हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. त्यामुळे नाट्य परिषदेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती. आता मतदारांना बॅलेट पत्रिकेद्वारे मतदान न करता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. राज्यात एकूण 23,450 मतदार आहेत. 19 जिल्ह्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी (ता. 19) अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी 22 जानेवारीला जाहीर होणार आहे.

शेवटच्या तीन तासांत 60 हून अधिक अर्ज
अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी साडेसातपर्यंतची वेळ देण्यात आली होती. अखेरच्या तीन तासांत 60 हून अधिक अर्ज दाखल करण्यात आले. त्यात नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष मोहन जोशी यांच्या अर्जाचाही समावेश होता.

Web Title: mumbai news 80 form for natya parishad election