

Offensive language on hall ticket
ESakal
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत येणाऱ्या, परंतु स्वायत्त संस्था असलेल्या वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम नोंदणी अर्ज आणि हॉल तिकीटावर थेट शिव्यांचा उल्लेख करण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. यामध्ये अनेक आक्षेपार्ह उल्लेख असून, याची गंभीर दखल तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतली आहे.