Rickshaw Ban from railway station

Rickshaw Ban from railway station

ESakal

Mumbai News: मोठी बातमी! मुंबईच्या 'या' रेल्वे स्थानकावर रिक्षांना प्रवेश बंदी; नियम मोडल्यास दंड ठोठावणार, कारण काय?

Bhandup Station Rickshaw Ban: भांडुप स्टेशन रोडवर रिक्षांना प्रवेश बंदी घातली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी, आता मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल.
Published on

मुंबई : मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई केली आहे. भांडुप स्टेशन रोडवर नुकत्याच झालेल्या बेस्ट बस अपघातातून धडा घेत, रिक्षांना आता स्टेशन परिसरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये भांडुप स्टेशन रोडवर एका अनियंत्रित बसने बसला धडक दिल्याने तीन महिला आणि एका पुरूषासह चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com