अलिबागचा हापूस बाजारात दाखल

अलिबागचा हापूस बाजारात दाखल

नवी मुंबई - वाशी येथील घाऊक फळ बाजारात अलिबागचा हापूस दाखल झाला असून, आंब्याच्या मुहूर्ताच्या सहा पेट्यांची आज पूजा करण्यात आली. यापूर्वी कोकणातील हापूस बाजारात आला असला तरी यंदा अलिबागचा हापूस मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा सरस मानला जातो; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारात अलिबागच्या हापूसनेही मानाचे स्थान पटकावले आहे. तेथून चांगल्या दर्जाचा हापूस येत असल्यामुळे ग्राहकांना पसंती मिळत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोकणातून हापूस आंब्याची कलमे नेऊन लागवड केली. त्यानंतर त्या गावाचे नाव हापूस आंब्याला देण्यात आले. जुन्नरचा हापूस, कर्नाटकचा हापूस आणि अलिबागचा हापूस प्रसिद्ध झाले आहेत; मात्र त्यात अलिबाग हापूसने गुणवत्ता सांभाळली आहे. सागरी किनारपट्टीवरील हवामानामुळे किनारपट्टीच्या भागातील आंब्यांना चांगली चव असल्याचे समोर आले आहे. विशेषतः मुरूड-जंजिरा भागातून येणारा हा आंबा अनेक वर्षांपासून बाजारात येत आहे. तो कोकणातील हापूसप्रमाणेच दिसतो. कोकणातील हापूस हा लाल मातीतील, तर अलिबागचा हापूस हा काळ्या मातीतील आहे. त्यामुळे त्याच्या चवीत काहीसा फरक आहे; मात्र रत्नागिरी हापूसच्या खालोखाल त्याची चव आहे. त्यामुळे बाजारात त्याला चांगली  मागणी आहे.

फळ बाजारातील जय श्री राम गाळ्यातील फळ विक्रेते भगवान शिंगोटे यांच्याकडे आज हा हापूस दाखल झाला. दर वर्षी संक्रांतीनंतर येणारा हा हापूस आठवडाभर लवकर दाखल झाला. अलिबागच्या हाशिवरेमधील संदीप मारुती पाटील यांच्या बागेतून आंबा पाठविण्यात आला आहे.

१५०० रुपये डझन
अलिबाग हापूसला सुमारे १५०० ते २००० रुपये डझन भाव मिळाला आहे. या आंब्याला ग्राहकांचीही पसंती मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, हापूस आंबा बाजारात यायला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः हापूस आंब्यामुळे बाजारात मोठा व्यापार होत असल्यामुळे बाजार गजबजतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com