नदी संर्वधनासाठी अमृता फडणवीस यांना साकडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - मुंबईतील नद्यांच्या पुनर्वसनासाठी लढणाऱ्या "रिव्हर मार्च' या नदीप्रेमी संघटकांनी शनिवारी (ता. 17) अमृता फडणवीस यांची भेट घेतली. दहिसर, ओशिवरा, मिठी आणि पोईसर या नद्यांच्या संवर्धनासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजना आणि सद्यस्थितीबाबत संघटना सदस्यांनी त्यांना तपशीलवार माहिती दिली. 

बोरिवलीतील नॅशनल पार्क, मुंबईतील नद्यांची दुरवस्था, अरबी समुद्र आणि खारफुटीच्या जमिनी यांच्या संर्वधनासाठी रिव्हर मार्च संघटना काम करत आहे. काही महिन्यांपासून नद्या आणि उपनद्यांच्या पात्रांतील सिमेंटच्या बांधकामांमुळे होणारे नद्यांचे नुकसान, नष्ट होणारी जैवविविधता या समस्यांबाबत रिव्हर मार्चच्या सदस्यांनी पालिका आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापनाशी भेटून विनंती केली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची तक्रार सदस्यांनी अमृता फडणवीस यांच्याकडे मांडली. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह रिव्हर मार्चची बैठक घेण्याबाबत आश्‍वासन मिळाल्याचे रिव्हर मार्च सदस्या अरुणा शर्मा यांनी सांगितले. 

Web Title: mumbai news Amruta Fadnavis river