अंगणवाड्यांमध्ये पिकविणार पालेभाज्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - अंगणवाड्यांच्या समोरच परसबाग फुलवायची आणि त्याच हिरव्यागार पालेभाज्या मुलांच्या खिचडीसाठी वापरायच्या, ही प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली योजना आता 25 हजार अंगणवाड्यांसाठी वापरली जाणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्यात आज याबाबतचा सामंजस्य करार झाला असून, फाउंडेशनतर्फे झीरो बजेट गुंतवणूक करून भाज्या, फळे घेण्याचे तंत्र अंगणवाडी सेविकांना शिकवले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, जळगाव, परभणी, उस्मानाबाद आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुमारे 10 हजार परसबाग तयार करण्यात आल्या आहेत.
Web Title: mumbai news anganwadi vegetable