पालिकेची प्लास्टिकविरोधी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

बेलापूर - प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेत शहराच्या अनेक भागांतून १० टनांपेक्षा अधिक प्लास्टिक गोळा करण्यात आले. या मोहिमेत आठ विभाग कार्यालये, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, मंडळे, सोसायट्या, महिला मंडळे, बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. अनेक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही यात सहभागी झाले होते. 

प्लास्टिक हे पर्यावरण व मानवी आरोग्याला हानिकारक आहे. त्यामुळे प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून हद्दपार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. कुठेही, कसेही फेकून दिलेले प्लास्टिक त्याचे लगेच विघटन होत नसल्याने वर्षानुवर्षे तेथेच पडून राहते. त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होतो. यादृष्टीने मानवी जीवनाच्या व भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी आजच निर्धार करून प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. 

रस्त्यासाठी वापर
शहरातून गोळा केलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यावर तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रावर प्रक्रिया करून प्लास्टिक ग्रॅन्युल्स तयार करण्यात येणार आहेत. त्याचा वापर डांबरी रस्त्यांच्या कोटिंगसाठी करण्यात येणार आहे. प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम ही एका दिवसापुरती नसून नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरातूनच प्लास्टिकला हद्दपार केले पाहिजे. नागरिकांनी स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त म्हणजेच आरोग्यपूर्ण नवी मुंबईसाठी योगदान द्यावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी केले.

Web Title: mumbai news Anti-plastic campaign