एपीएमसीला 30 कोटींचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई  - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन वर्षांपासून व्यापाऱ्यांकडून सेवा कराची वसुली केली नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता बाजार समितीमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी समिती नेमली आहे. 29 ऑक्‍टोबरपर्यंत या समितीला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर यातील दोषींवर कारवाई होणार आहे. यामुळे बाजार समितीचे सुमारे 30 कोटींचे नुकसान झाले आहे. 

7 मार्च 2013 मध्ये पणन संचालकांनी बाजार समितीच्या नियमनातून वगळलेल्या वस्तूंवर एक रुपयाप्रमाणे सेवा लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बाजार समितीच्या संचालक मंडळात यावर चर्चा होऊन मार्च 2014 मध्ये हा सेवा कर वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी काही व्यापाऱ्यांनी हा कर भरण्यास विरोध केला होता. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती; परंतु ती मान्य झाली नाही. या सेवा कराची वर्षाची रक्कम 15 कोटींच्या घरात आहे. त्यानंतर 2015 च्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर विचार करण्यात आला; मात्र त्याला स्थगिती मिळाली नाही. असे असताना त्या वेळी बाजार समितीच्या सचिवांनी हा सेवा कर व्यापाऱ्यांकडून वसूल केला नाही. त्यामुळे बाजार समितीचे हे उत्पन्न बुडाल्यात जमा आहे. हे प्रकरण आता उजेडात आल्याने बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. सेवाकराच्या वसुलीमध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. या काळात शिवाजी पाहिनकर बाजार समितीचे सचिव होते. त्यानंतर बाजार समितीवर प्रशासक म्हणून सतीश सोनी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

सेवाकराच्या वसुलीमध्ये अनियमितता झाल्याचे उघड आले आहे. हा सेवा कर का घेतला नाही, त्यात कोण दोषी आहेत याची माहिती अहवाल आल्यानंतर मिळेल. त्यानंतर यातील दोषींवर कारवाई केली जाईल. 
- सतीश सोनी, प्रशासक, बाजार समिती

Web Title: mumbai news apmc