Mumbai News : खड्डे मुक्तीसाठी मुंबईकरांना आवाहन; टोल फ्री नंबरवर नोंदवता येणार तक्रार | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai News

Mumbai News : खड्डे मुक्तीसाठी मुंबईकरांना आवाहन; टोल फ्री नंबरवर नोंदवता येणार तक्रार

मुंबई, ता, 3 - खड्ड्यांच्या पालिका बदनाम झाली आहे. दरवर्षी खड्डयाचा विषय गाजतो. पालिकेने आपला बजाव करण्यासाठी आता तुम्हीच खड्डे दाखवा, अशी साद मुंबई महापालिकेने मुंबईकरांना घातली आहे. खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी १८००२२१२९३ टोल फ्री नंबर, रस्ते अभियंत्यांचे मोबाईल नंबर व मोबाईल अँप उपलब्ध केला आहे.

खड्डे मुक्त रस्त्यांसाठी दरवर्षी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र मुंबईतील रस्त्यांची विशेष करुन पावसाळ्यात खड्ड्यांमुळे चाळण होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी रस्ते खड्डे मुक्त दिसावेत यासाठी खड्डे मुक्तीसाठी थेट मुंबई महापालिकेने मुंबईकरांना साद घातली आहे.

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी १८००२२१२९३ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला असून २२७ प्रभागांतील रस्ते अभियंत्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध केले आहेत. तसेच MCGM 24×7 हा मोबाईल अँप उपलब्ध केला असून प्ले स्टोअर मध्ये डाऊनलोड करता येईल, असे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या खड्डा बुजला नाही तर कारवाई कोणावर यावर बोलणे टाळले आहे.

दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून ही मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त का होत नाही, असा सवाल विरोधकांकडून दरवर्षी उपस्थित केला जातो.

टॅग्स :Mumbai News