

Theater
Esakal
निलेश मोरे
घाटकोपर : मुंबईतील दादर, विलेपार्ले, बोरिवली आणि मुलुंड येथील महानगरपालिकेच्या नाट्यगृहांमुळे मराठी रंगभूमीला उत्तम प्रतिसाद मिळत असताना, त्याच धर्तीवर घाटकोपर पूर्व भागातही मराठी नाट्यगृह सुरू होण्याची गेल्या अनेक वर्षांची चर्चा अखेर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. २०१७ पासून प्रेक्षकांना केवळ प्रतीक्षा करावी लागत असलेल्या या नाट्यगृहासंदर्भात सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी महत्त्वपूर्ण बैठकीत एक महिन्याच्या आत नाट्यगृह कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.