अशोक सावंत हत्येतील दोघांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई - कांदिवली पूर्वेतील समतानगर येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गणेश जोगदंड आणि सोहेल दोधिया यांना न्यायालयाने मंगळवारी (ता. 9) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी चार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. अटक आरोपी हे मुख्य आरोपीचे साथीदार आहेत. रविवारी (ता. 7) रात्री सावंत घरी परतत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सावंत यांच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी सोमवारी (ता.

मुंबई - कांदिवली पूर्वेतील समतानगर येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गणेश जोगदंड आणि सोहेल दोधिया यांना न्यायालयाने मंगळवारी (ता. 9) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी चार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. अटक आरोपी हे मुख्य आरोपीचे साथीदार आहेत. रविवारी (ता. 7) रात्री सावंत घरी परतत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सावंत यांच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी सोमवारी (ता. 8) तांत्रिक तपास करून दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत आणखी काही नावे पुढे येण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तवली. 

Web Title: mumbai news ashok sawant murder case