एटीएम सेंटरमध्ये फसवणूक करणाऱ्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

मुंबई - एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष विचलित करून, त्यांच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली. सत्येंद्र मिश्रा व भानुप्रसाद मिश्रा अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी शहराच्या विविध भागांतील अनेक नागरिकांना लाखो रुपयांना गंडवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

हे दोघे एटीएम मशिनच्या वापराबाबत अज्ञानी असलेल्या नागरिकांना हेरून त्यांची फसवणूक करायचे. एटीएम केंद्रात पैसे काढायला येणाऱ्यांवर ते लक्ष ठेवून असत. एखादी व्यक्ती अशिक्षित असल्याचे वाटल्यास दोघांपैकी एक सेंटरमध्ये जात असे. तो त्या सेंटरमधील दुसऱ्या मशिनमधून पैसे काढण्याचा बहाणा करत असे. त्या व्यक्तीने मशिनमध्ये कार्ड स्वॅप केल्यावर चोर तिचे लक्ष विचलित करत मशिन बंद असल्याचे सांगून दुसऱ्या मशिनवर पैसे काढण्यासाठी येण्याची सूचना करत असे. कार्ड स्वॅप झाल्यानंतर सुरू असलेले सेशन अर्धवट सोडून ती व्यक्ती शेजारच्या मशिनवर पैसे काढण्यासाठी गेल्याचे पाहून मागे रांगेत उभा असलेला चोराचा दुसरा साथीदार सुरू असलेले सेशन हाताळत असे. ती व्यक्ती पैसे काढून निघून गेल्यानंतर शोल्डर सर्फिंगद्वारे पाहिलेल्या पिन कोडच्या आधारे ते दोघे त्यांच्या खात्यातून पैसे काढून पळ काढत.

Web Title: mumbai news ATM centre crime