मानलेल्या नातवाचा आजीबाईंवर हल्ला; दोन लाख लांबवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

धारावी : नातू मानलेल्या 15 वर्षांच्या शेजारच्या मुलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धारावीतील एक आजीबाई शीव रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहेत.

धारावीच्या 90 फुटी रस्त्यावरील चित्रकूट इमारतीत राहणाऱ्या सराफाचा मुलगा शेजारी राहणाऱ्या सविताबेन वारिया (वय 70) यांच्या घरी नेहमीप्रमाणे गेला होता. त्याला आई नसल्याने सविताबेन त्याला नातवाप्रमाणे वागवत. तो घरी येताच सविताबेन यांनी नेहमीप्रमाणे त्याला खाऊ घातले. खाता खाता त्याची नजर सविताबेन यांच्या पर्सवर पडली. त्यांची नजर चुकवून पर्स लांबवण्याचा प्रयत्न करताना सविताबेन यांनी त्याला पकडले.

तो माफी मागेल. हात जोडेल, पाया पडेल, अशी सविताबेन यांची अपेक्षा होती; परंतु त्याने सविताबेन यांच्यावर चाकू, धोपटणे, लाठी आणि कात्री या वस्तूंनी हल्ला केला. सविताबेन यांनी जीवाच्या आकांताने त्याला प्रतिकार केला. त्याने टॉवेलने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्याचा हाही प्रयत्न सविताबेन यांनी हाणून पाडला. अखेर त्याने त्यांना लादी धुण्याचे रसायन पाजले. सविताबेन यांचा प्रतिकार थांबल्यानंतर त्याने त्यांच्या घरातील एक लाख 90 हजार रुपये घेऊन पोबारा केला.

सविताबेन यांना गंभीर अवस्थेत शीव रुग्णालयात दाखल केले. त्या सध्या मृत्युशी झुंज देत आहेत. पोलिसांनी मुलाला अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Web Title: mumbai news attack on grand mother

टॅग्स