तीन दिवस पहाटेपर्यंत बार उघडे राहणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

मुंबई - नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेच्या मर्यादेचे नियम शिथिल केले आहेत. रविवारपासून दोन दिवस आणि 31 डिसेंबरला पहाटे पाचपर्यंत बार खुले राहतील. वाईन शॉप रात्री एकपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी आहे.

दर वर्षी गृहविभाग राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन तीन दिवस पहाटे पाचपर्यंत बार खुले ठेवण्यास परवानगी देते. नुकतेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक परिपत्रक जारी केले. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलनाही या तीन दिवशी पहाटे पाचपर्यंत व्यवसाय करता येणार आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये, याकरिता उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बनावट दारूची तस्करी रोखण्याकरिता दक्षता पथकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: mumbai news bar open 3 days