बी हॅप्पी महोत्सवात आबालवृद्धांचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - अंधेरी पश्‍चिमेतील लोखंडवाला बॅक रोडवर रविवारी ‘बी हॅप्पी’ रस्ता महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हसत-खेळत-बागडत रस्त्यावर धमाल करण्यासाठी हजारो नागरिक आणि मुले रस्त्यावर उतरली होती. सकाळी ७ ते १० दरम्यान झालेल्या महोत्सवात बच्चे कंपनीने विविध कला सादर करून धमाल केली. 

मुंबई - अंधेरी पश्‍चिमेतील लोखंडवाला बॅक रोडवर रविवारी ‘बी हॅप्पी’ रस्ता महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. हसत-खेळत-बागडत रस्त्यावर धमाल करण्यासाठी हजारो नागरिक आणि मुले रस्त्यावर उतरली होती. सकाळी ७ ते १० दरम्यान झालेल्या महोत्सवात बच्चे कंपनीने विविध कला सादर करून धमाल केली. 

रविवारच्या सकाळी बिछान्यात उशिरापर्यंत लोळत पडण्याचा शिरस्ता मोडत हजारो अंधेरीवासीयांनी ‘बी हॅप्पी’ महोत्सवात आवर्जून हजेरी लावली. सकाळी ७ वाजल्यापासूनच शेकडो लहान-तरुण मुले-मुली रस्त्यावर मनमुराद सायकलिंग आणि स्केटिंग करत होते. एका बाजूला मित्र-मैत्रिणींचा घोळका कॅरम किंवा बुद्धिबळ खेळण्यात रमला होता. दुसरीकडे मुले बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळत होती. ज्येष्ठ नागरिक योगासने शिकत होते. काही उत्साही तरुण व्यायाम करत होते. कुणी नाचत होते, कुणी गात होते, तर कोणी विनोद सांगून इतरांना हसवत होते. रस्ता महोत्सव आयोजित करणाऱ्या ‘बी हॅप्पी फाऊंडेशन’च्या विश्‍वस्त शालिनी ठाकरे यांनी नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादाविषयी आनंद व्यक्त केला. मुले, तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांना फिरण्याचा, मनसोक्त खेळण्याचा आणि सायकल चालवण्याचा आनंद उपभोगता यावा, म्हणून आम्ही हा महोत्सव भरवला, असे त्यांनी सांगितले.

विविध कलांचे दर्शन 
रस्ता महोत्सवात विविध संस्थांच्या लहान मुला-मुलींनी कलेचे सादरीकरण केले. सर्वांत चित्तथरारक सादरीकरण झाले ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील जिमनॅस्ट गुरू पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या चिमुकल्या जिमनॅस्टपटूंचे. निवृत्त कर्नल सुमिषा शंकर यांनी योगासनांचे धडे दिले. ‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा अभिनेता रोहताश गौड यांच्यासह अनेक सेलिब्रिटीही महोत्सवाला आवर्जून उपस्थित होते.

Web Title: mumbai news Be Happy festival children