बेस्टचा आजचा संप स्थगित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई - औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार बेस्ट कामगार कृती समितीने बुधवारी (ता. 14) मध्यरात्रीपासून पुकारलेला संप स्थगित केला आहे. मात्र, न्यायालयाच्या मंजुरीशिवाय यापुढे बेस्ट प्रशासनाला खासगी बस भाड्याने घेता येणार नाहीत. यासंदर्भात 5 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बस विकत न घेता 430 खासगी बसच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचा निर्णय बेस्ट समितीने घेतला होता. याला शिवसेनेनेही मंजुरी दिली होती.

मात्र, हा बेस्टच्या खासगीकरणाचा डाव असून, त्यामुळे भविष्यात कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, असा दावा करत हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बेस्ट कामगार कृती समितीने मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. त्याविरोधात बुधवारी बेस्ट प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने कामगार संघटनांना संप न करण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील सुनावणीपर्यंत खासगी बस भाड्याने घेण्यासाठीही स्थगिती देत न्यायालयाने कामगार संघटनांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संप तूर्तास स्थगित करण्यात आला असून, न्यायालयात खासगीकरणाबाबत भूमिका मांडू, असे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.

Web Title: mumbai news best bus strike stop