Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

मुंबईताल भांडुपमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये चक्क टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती करण्यात आली आहे.
Bhandup hospital
Bhandup hospital

Mumbai News: ईशान्य मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये चक्क टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती करण्यात आली आहे. संतापजनक म्हणजे या हलगर्जीपणामुळे महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सदर घटनेमुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. (Mumbai Bhandup News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूती करण्यासाठी एक महिला पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. गर्भवती महिलेचा सिझर करताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे डॉक्टरांना टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती करावी लागली. या सर्व अव्यवस्थेत नवजात बाळाचा मृत्यू झाला. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, महिलेचा देखील मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

Bhandup hospital
Nashik Crime : कपाटाची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला; मनमाडच्या गांधी चौकातील घटना

दुर्गम भागामध्ये पुरेशा सोयी-सुविधा नसल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो, पण मुंबईच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्येच असा प्रकार घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. वीज खंडित झाली तर पर्यायी सोय उपलब्ध असायला हवी होती. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे या घटनेवरुन समजून येईल. विशेष म्हणजे अशाच प्रकारच्या घटना याठिकाणी आधी सुद्धा घडल्या आहेत.

Bhandup hospital
Mumbai Local Crime: चेष्टामस्करी करण्याच्या वादातून धावत्या लोकलमध्ये मित्रावर चाकूहल्ला!

महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची दखल मुंबई महानगरपालिकेकडून घेण्यात आली असून डेथ रिव्ह्यू कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कमिटीमध्ये पालिकेचे डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची २ मे रोजी बैठक होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com