इंधनबचतीसाठी भारत पेट्रोलियमची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मुंबई - पर्यावरणपूरक इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी "भारत पेट्रोलियम'ने संरक्षणक्षमता महोत्सव (सक्षम) ही मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई - पर्यावरणपूरक इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी "भारत पेट्रोलियम'ने संरक्षणक्षमता महोत्सव (सक्षम) ही मोहीम हाती घेतली आहे.

16 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान देशभरात ही मोहीम राबविली जाणार आहे. पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करणे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकारकडून या मोहिमेबाबत जनजागृती केली जाणार आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भारत पेट्रोलियमच्या या मोहिमेला नुकतीच सुरवात झाली.

Web Title: mumbai news bharat petrolium campaign for fuel saving