आयएमईआय क्रमांक बदलणारी टोळी अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

भिवंडी - विविध ठिकाणांहून संगनमताने महागडे मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक (आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक) बदलणाऱ्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल तपासानंतर अटक केली आहे.

भिवंडी - विविध ठिकाणांहून संगनमताने महागडे मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक (आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक) बदलणाऱ्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सखोल तपासानंतर अटक केली आहे.

शोएब खुर्शीद मोमीन (वय २९, रा. समदनगर), अनस सऊद अहमद मोमीन (३१), दाऊद अन्सारी (३५), अकबर शेख (३२), आरीफ कालिया (२६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने अन्य सात जणांसोबत संगनमत करून विविध ठिकाणांहून एक लाख ३८ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ६२ महागडे मोबाईल चोरून या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक नष्ट करून ते कमी किमतीत विकल्याचे आढळून आले आहे. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांना या टोळीची माहिती मिळताच त्यांनी पथकासह आरोपींच्या घरावर छापे टाकून मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलण्याचे सॉफ्टवेअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिव्हाईस, लॅपटॉप, संगणक असे दोन लाख १५ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.

Web Title: mumbai news bhiwandi crime