भिवंडीत डान्सबारमधील 17 नर्तकींवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

भिवंडी - तालुक्‍यातील दापोडे येथील डब्ल्यूडब्ल्यूएफ (साई सेवा) डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून 17 नर्तकींसह 29 जणांवर कारवाई केली; मात्र या कारवाईवेळी बारमालक व व्यवस्थापकाने पोलिसांना गुंगारा दिला. मनोरंजनाच्या नावाखाली लेडीज बारमध्ये महिलांना विक्षिप्त नाचगाणे करण्यास लावले जात असल्याची तक्रार भिवंडी स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हनुमंता कुंचीकोरवे यांनी छापा टाकला.

भिवंडी - तालुक्‍यातील दापोडे येथील डब्ल्यूडब्ल्यूएफ (साई सेवा) डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून 17 नर्तकींसह 29 जणांवर कारवाई केली; मात्र या कारवाईवेळी बारमालक व व्यवस्थापकाने पोलिसांना गुंगारा दिला. मनोरंजनाच्या नावाखाली लेडीज बारमध्ये महिलांना विक्षिप्त नाचगाणे करण्यास लावले जात असल्याची तक्रार भिवंडी स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हनुमंता कुंचीकोरवे यांनी छापा टाकला. त्यात 17 नर्तकी, आठ ग्राहक, दोन वेटर्स, कॅशिअर व व्यवस्थापक अशा 29 जणांवर कारवाई करण्यात आली; मात्र बारमालक जनार्दन पुजारी व दीपक शेट्टी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेले. या प्रकरणी दोघा बांगलादेशी नर्तकींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

Web Title: mumbai news Bhiwandi Dancebar Dancer