शिवसेना - भाजपच्या पाटील आमने-सामने 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई -  कॉंग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या भांडुप प्रभाग क्रमांक 116 मधील नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना - भाजपच्या पाटील भिडणार आहेत. भाजपने प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील आणि शिवसेनेने माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 

भांडुपमधील हा प्रभाग कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर जागृती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारीही मिळवली. भाजपसाठी ही पोटनिवडणूक जिंकणे जास्त सोपे असल्याचे मानले जात आहे. मात्र, शिवसेनाही या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरणार आहे. 11 ऑक्‍टोबरला होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. 22) भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 

भाजपचे अपक्षांसह 84 नगरसेवक आहेत; तर शिवसेनेचे अपक्षांसह 87 नगरसेवक आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे शिवसेना - भाजपच्या संख्यबळात फारसा फरक नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची आहे. मीनाक्षी पाटील या शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी आहेत. 

कॉंग्रेसचा उमेदवार ठरला नाही 
भांडुप परिसरात पाटील कुटुंबीयांचा दबदबा होता. त्यामुळे या परिसरात कॉंग्रेसचा झेंडा कायमच फडकत राहिला. मात्र, जागृती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता कॉंग्रेसला उमेदवार मिळणेही अवघड झाले. त्यामुळे कॉंग्रेसने अद्याप उमेदवारी अर्जही भरलेला नाही.

Web Title: mumbai news bjp shiv sena