भाजपच्या इस्राईल प्रेमाला शिवसेनेचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई - भाजपच्या इस्राईल प्रेमाला शिवसेनेने आज दणका दिला. काळा घोडा (फोर्ट) येथील चौकाला इस्राईलचे दिवंगत पंतप्रधान शिमोन पेरीज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीने आज फेटाळला. शिवसेनेने समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या सुरात सूर मिसळत हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी इस्राईलचा दौरा केला होता. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रसिद्ध तीनमूर्ती चौकाला इस्राईलच्या शहराचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारत भेटीवर आले होते. त्यापूर्वी पेरीज यांचे नाव काळा घोडा चौकाला देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्या वेळी कोणतीही ठोस भूमिका न घेता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला. यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव "ए, "बी', ई' या प्रभाग समितीपुढे मांडला. हा प्रस्ताव शिवसेना, कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहुमताच्या जोरावर दफ्तरी दाखल केला.

Web Title: mumbai news bjp shivsena