Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

दोन्ही धावपट्याची सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देखभाल
Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Mumbai News: मान्सूनपूर्व दुरुस्तीकरीता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्या ९ मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्याची देखभाल करण्यात येणार आहें. या काळात विमान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर विमान वाहतूक सुरु होईल.

जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून मुंबई विमानतळाला ओळखले जाते. दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला सुमारे ४६ विमानांचे आगमन व उड्डाण होते; तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला अंदाजे ३५ विमानांचे उड्डाण व आगमन होते.

सध्या दररोज सुमारे ९५० विमानांची ये - जा होते. मुंबई विमानतळ हे सुमारे १०३३ एकर क्षेत्रात पसरलेले आहे. पावसाळयात देखील हवाई वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी धावपटयाची देखभाल दुरुस्ती केली जाते.

धावपट्टी देखभालीच्या कामाच्या वार्षिक सरावामध्ये इंजिनीअरिंग आणि एअरसाइड टीम्समधील तज्ञांचा समावेश असतो. त्याच्या सहाय्याने दैनंदिन ऑपरेशन्समुळे उद्भवलेल्या सूक्ष्म टेक्सचर आणि मॅक्रो टेक्सचर झीज आणि एअरसाइड स्ट्रिप मजबूत करण्यात मदत करण्यासाठी धावपट्टीच्या पृष्ठभागाची तपासणी केली जाते. पावसाळ्याच्या चार महिन्यात मुंबई विमानतळावरुन जवळपास ९३ हजार विमानाद्वारे अंदाजे ११ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक होते.

एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या वैमानिक आणि केबिन क्रू कर्मचाऱ्यांनी दिल्लीला मंगळवारी संध्याकाळी अचानक आजारपणाचे कारण देत सामुहिक रजा घेतली. त्यामूळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवेला बसला. मुंबईत बुधवारी दिवसभरात काही विमाने रद्द करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com