पूल पुनर्बांधणीत रेल्वेची दमछाक

विष्णू सोनवणे
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मुंबई - चर्नी रोड पूल दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरील धोकादायक ब्रिटिशकालीन पुलांची चिंता रेल्वे व पालिका प्रशासनाला सतावू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही प्राधिकरणांनी कर्नाक व हॅंकॉक पुलांची कामे वेगाने पूर्ण करण्यात लक्ष घातले आहे; परंतु या पुलांच्या कामाची वर्क ऑर्डर देऊनही कामे अडली व ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने रेल्वे व पालिकेची दमछाक झाली आहे. या कामाची उच्च न्यायालयाने दखल घेतल्यास कामांना वेग येण्याची शक्‍यता आहे. 

एल्फिन्स्टन रोड, चर्नी रोड रेल्वेस्थानक येथील दुर्घटनांनंतर रेल्वेचे ब्रिटिशकालीन पूल काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यामुळे पालिकेने जुन्या पुलांचे मायक्रोप्लानिंगचे काम होती घेतले. राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या ब्रिज मॅनेजमेंट सिस्टीमच्या धर्तीवर मुंबईतील जुन्या पुलांची कामे वर्गवारीनुसार केली जाणार आहेत. त्यात प्राधान्याने ब्रिटिशकालीन पुलांची कामे पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहेत. हॅंकॉक ब्रिज तोडल्यानंतर त्या पुलाची फेरनिविदा काढल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे पुलाचे काम अडले आहे. हॅंकॉक पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय कर्णाक पुलाचे काम हाती घेऊ नये, या मागणीसाठी एका एनजीओने न्यायालयात धाव घेतली आहे. कर्णाक पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी ऑगस्टमध्ये पालिकेने वर्क ऑर्डर काढली; मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने वाहतूक पोलिस कामासाठी परवानगी देत नसल्याचे पालिकेच्या पूल अभियंता खात्यातील अधिकारी सांगत आहेत. रेल्वेवरील पुलांची कामे रेंगाळली असून, त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे.

सामोपचाराने चर्चा करून कामे मार्गी लावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने दखल घेतल्याने पालिका आणि रेल्वे प्रशासन हादरले आहे. कामांतील अडथळे दूर होऊन कामांना लवकरच वेग येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुनर्बांधणीसाठी ६५ कोटी
रेल्वे आणि पालिका त्यांच्या हद्दीतील कर्णाक पुलाचे तोडकाम करणार आहे. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पालिकेने ६५ कोटींची तरतूद केली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या पुलाचे काम करायचे आहे; मात्र अडथळे दूर झाल्याशिवाय पूल पाडणे तसेच पुनर्बांधणी करण्याच्या कामाला सुरुवात करता येत नसल्याची खंत पालिकेच्या रस्ते अभियंता खात्याच्या अधिकाऱ्यांनी 
व्यक्‍त केली.

Web Title: mumbai news bridge reconstructed by railway