भायखळा 'दगडी चाळीत' उभारला 'स्वर्ण महल'

भायखळा 'दगडी चाळीत' उभारला 'स्वर्ण महल'
भायखळा 'दगडी चाळीत' उभारला 'स्वर्ण महल'

आई भवानी माता दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मुंबई: दक्षिण मुंबईतील भायखळा येथील भूमिगत विश्वातीतल (अंडर वर्ल्ड) सदैव चर्चेत राहणारे एक नाव म्हणजे दगडीचाळ आणि त्यात असलेलेल्या असंख्य गोष्टीं अनेकाविध गुढ गोष्टी या नेहमीच मुंबईकरांसाठी कुतुहलाचे एक अनोखे विश्व ठरलेले आहे. त्या विश्वाचा जन्मदाता अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष आणि माजी विधानसभा सदस्य आमदार अरुण गुलाब गवळी यांनी भायखला दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रौत्सवात  स्थापिलेली "दगडी चाळीची आई भवानी माता" होय.

यंदा दगडी चाळीत 'स्वर्ण महलात' भवानी माता प्रसन्न वदनी उभी असून, तिच्या मनोहर मूर्तीकड़े पाहताच मुकुटा पासून ते पैजनांपर्यंत विविध आकर्षक  सुवर्णालंकारांनी सजविलेल्या आईच्या मुख कमलावरील तेजोमय आभा पाहिल्यास  भक्तांच्या मनामध्ये नव उर्जेचे स्त्रोत व नव चैतन्य निर्माण करते आहे असेच वाटते. हिच नवी ऊर्जा, नवी चेतना दर्शनाने तृप्त झालेले भाविक आपल्या सोबत घेत आई माऊली चा उदो उदो करीत मार्गस्थ होतात.

दगडी चाळीचे सर्वेसर्वा अरुण गवळी सध्या कारागृहात असून, त्यांच्या दोन्ही कन्या गिता आणि योगिता यांनी नवरात्र उत्सवाची सूत्रे अप्रत्यक्ष आपल्या हाती घेतल्याचे जाणवत आहे. प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका गीता गवळी यांनी बहिण योगिता गवळी ज्या 'करा फाउंडेशन'च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी करा फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबई महानगर पालिका शाळा तसेच काही खाजगी शाळांतील विद्यार्थीनीना रजस्वला काळातील त्या 4-5 दिवसांत तणाव मुक्त राहण्यासाठी कम्फर्टेबल असणारे 'सॅनेटरी नॅपकिन' मोफत उपलब्ध करुन देत आपल्या सामाजिक कार्याचा आलेख उंचाविला. त्यांनी या पुढेही समाजातील गरीब तसेच अनाथ महिलांसाठी विविध योजना आखण्याचा संकल्प केला आहे.

नवरात्रीतील आजचा शुक्रवार दुसरा दिवस असूनही भवानी मातेच्या दर्शनासाठी आणि ख़ास दगडी चाळीच्या आकर्षणात भर घालित आहेत, त्यामुळे लोकांची गर्दी वाढतच आहे. देवीच्या अंगावरील शोभिवंत अस्सल सोन्याचे दागिने पाहण्यास खास महिला भाविकांची  गर्दी वाढते आहे.

दगडीचाळ आई भवानीसाठी उभारलाय खास स्वर्ण मयूर महल आणि त्यात प्रदर्शन भागी दोन मयूर आणि दहा सिंहमुखी स्तंभ स्वर्ण महालाच्या आकर्षक दिसण्यात मोठी भूमिका बजावित आहेत, असे भायखला दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ अध्यक्ष विनायक करावडे, सेक्रेटरी अनिल शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com