कार्ड क्‍लोनिंगद्वारे बॅंक खात्यांवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - स्कीमरच्या साह्याने एटीएमची माहिती मिळवून सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या 41 जणांच्या खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार घडला आहे. दिल्ली, गुजरात येथून हे पैसे काढण्यात आले आहेत. याप्रकरणी सीएसटी येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मरीन ड्राइव्ह स्थानकाबाहेर प्रिंटिंग प्रेसजवळ असलेल्या एटीएम वापरणाऱ्यांच्या बॅंक खात्यातून रक्कम कमी झाल्याने तेथेच स्कीमर लावण्यात आला होता असा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. काही व्यक्तींच्या खात्यातून 10 हजार; तर काहींच्या 15 हजार असे 10 लाख 20 हजार रुपये लंपास करपण्यात आले आहेत. एका खातेधारकाच्या खात्यातून सर्वाधिक 80 हजार रुपये गेले आहेत.

प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या नरेंद्र ब्रीद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आणखी 40 जणांच्या खात्यावरून रक्कम काढण्यात आली आहे.

वर्षभरातील कार्ड क्‍नोनिंगचा हा मोठा गुन्हा असून, त्यातील तक्रारदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news card cloning bank account cheating crime