बेलापूरमधील पालिकेच्या इमारतीची दुरवस्था 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

बेलापूर - सीबीडी बेलापूरमधील शहाबाज सेक्‍टर १९ येथील पालिकेच्या इमारतीचा वापर होत नसल्याने ती जीर्ण झाली आहे. दुरवस्था झालेली इमारत कोसळून जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे.

बेलापूर - सीबीडी बेलापूरमधील शहाबाज सेक्‍टर १९ येथील पालिकेच्या इमारतीचा वापर होत नसल्याने ती जीर्ण झाली आहे. दुरवस्था झालेली इमारत कोसळून जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने सीबीडी बेलापूरमधील शहाबाज सेक्‍टर १९ येथे इमारत बांधली होती. २००५ पासून या इमारतीचा वापर बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी एकही कुटुंब राहत नसल्याने ही पडीक इमारत मोडकळीस आली आहे. तेथे भटकी कुत्री आणि गर्दुल्ले यांचा वावर वाढला आहे. इमारतीमधील अंतर्गत भागात पडझड झालेली आहे. त्यामुळे ही इमारत कधीही कोसळण्याची शक्‍यता आहे. ती रस्त्याच्या कडेला असल्याने त्यात जीवितहानी होण्याचा धोका आहे. या इमारतीची डागडुजी वेळेवर न झाल्याने तिला सर्व बाजूंनी तडे गेले आहेत. तेव्हा पालिकेने तिची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचे अध्यक्ष ओमकार गंधे यांनी केली आहे.

Web Title: mumbai news CBD belapur municipal building