सोनसाखळी चोरांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोपरखैरणे  - नवी मुंबई परिसरात साखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना नेरूळ ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाख 39 हजार 200 रुपयांचे 264 ग्रॅमचे दागिने हस्तगत केले आहेत. सीसी टीव्ही फुटेजमुळे पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले. 

नवी मुंबईत नेरूळ परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी विशेष पथके तयार केली होती. या पथकाकडे फक्त सोनसाखळी चोरी करणारे दाखलेबाज गुन्हेगार, त्यांचा तपशील, गुन्ह्यांची पद्धत आदी माहिती घेऊन त्यांना पकडण्याचे व अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम दिले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. त्यांनी सर्फराज अल्लाउद्दीन शेख (वय 35) आणि एजाज मुनीर मुल्ला (42) यांना अटक केली. राजपूत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचून रबाळे झोपडपट्टीतून सर्फराजला अटक केली. नंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एजाजलाही अटक केली. त्यांचा अन्य साथीदार फरारी आहे. एजाज चोरीच्या दागिन्यांची विल्हेवाट लावत होता. त्यांच्याकडून सात लाख 39 हजार 200 रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिस निरीक्षक रंजन औटी, सहायक निरीक्षक राजेश गज्जल यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

या आरोपींना पकडण्यात सीसी टीव्हीची मदत झाली. नेरूळमधील सुजाता पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरताना त्याचे चित्रण सीसी टीव्हीत झाले होते. त्यावरून पोलिसांनी या दोघांना अटक केली. 

Web Title: mumbai news Chain snatcher