सराईत सोनसाखळी चोर गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - सोनसाखळी खेचल्यानंतर त्या महिलांना उलटसुलट माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्यासाठी साथीदाराला चोरीच्याच जागी उभे करण्याची शक्कल लढविणाऱ्या चोराला पोलिसांनी अखेर अटक केली. विजय ऊर्फ सद्दाम कृष्णा काळे असे आरोपीचे नाव आहे. विजयच्या विरोधात 50 हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचे दोन साथीदार फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. विजयचा ताबा शीव पोलिसांनी घेतला असून, त्याची चौकशी सुरू आहे. 

सोनसाखळीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला विजय दीड महिन्यापूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने फरारी साथीदारांसोबत माहीम आणि शीव परिसरात चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले. विजय हा मोटरसायकल चालवायचा, तर एक साथीदार सोनसाखळी चोरायचा; तर दुसरा साथीदार चोरीच्या संभाव्य जागेवर थांबायचा. सोनसाखळी चोरीपूर्वी पोलिसांच्या नाकाबंदीची आणि दागिने घातलेल्या महिलांची माहिती तो विजयला द्यायचा. विजयने गुन्हा केल्यानंतरही फरारी आरोपी तेथेच थांबायचा. महिलेने त्या मोटरसायकलचा क्रमांक नोंदवून घेतला नाही ना, याची तो खात्री करायचा; तसेच पोलिसांची दिशाभूल करण्याकरता आरोपी चुकीच्या रस्त्याने गेल्याचे सांगायचा. माहीममध्ये झालेल्या सोनसाखळी चोरीप्रकरणी गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक गोवर्धन गिरवणे यांच्या पथकाने तांत्रिक माहिती काढली. आरोपी हे गुन्ह्याकरता चोरीची मोटरसायकल वापरून नंतर मोटरसायकल सार्वजनिक वाहनतळामध्ये ठेवून टॅक्‍सीने निघून जायचे. पोलिसांनी मोटरसायकलचा क्रमांक मिळवून पाळत ठेवली. विजयने माहीम परिसरातील वाहनतळाजवळ मोटरसायकल उभी केल्याचे पोलिसांना आढळले. नंतर मोटरसायकल घेण्यासाठी आल्यावर त्याला सापळा रचून पोलिसांनी पकडले. फरारी साथीदारांपैकी एकावर 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: mumbai news chain snatching crime

टॅग्स