स्वच्छ चैत्यभूमीसाठी तरुणाई एकवटली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

दादर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून हजारो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने येतात. या अनुयायींकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. त्यामुळे चैत्यभूमीचा परिसर खराब होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणांनीच दादर विभागात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत राज्यातील अनेक तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. 

"आपली भूमी चैत्यभूमी, स्वच्छ भूमी' या अभियानांतर्गत बुधवारी (ता. 6) सकाळी 7.30 वाजता अभिवादन रॅली काढून या तरुणांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. चैत्यभूमी परिसर तसेच शिवाजी पार्क परिसरात 10-10 जणांचा ग्रुप करून या तरुणांनी स्वच्छता मोहीम राबवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून हजारो अनुयायी या मोहिमेत सहभागी झाले होते. मोहिमेत सहभागी झालेले अतुल कांबळे म्हणाले, सोशल मीडियामुळे अनेकजण एकत्र आले आहेत. पावसामुळे लोक विखुरले असले, तरीही चैत्यभूमीवर अनुयायी लाखोंच्या संख्येने येत आहेत. दिवसभर आम्ही आमच्या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना संपूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली 
मी विक्रोळीवरून आलो आहे, तर माझे अनेक सहकारी महाराष्ट्रामधील विविध ठिकाणांवरून आलेले आहेत. आम्ही एकोप्याने चैत्यभूमी स्वच्छ करण्यासाठी सज्ज आहोत. ही मोहीम रात्री 12 पर्यंत सुरू असणार आहे. आजचा पूर्ण दिवस आम्ही बाबासाहेबांना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहणार आहोत, असे "आपली भूमी चैत्यभूमी, स्वच्छ भूमी' या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले अक्षय भोसले याने सांगितले.

Web Title: mumbai news Chaitya Bhoomi dr babasaheb ambedkar Dadar