खोकल्याच्या त्रासामुळे भुजबळ रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खोकल्याच्या त्रासामुळे उपचारासाठी शुक्रवारी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

भुजबळ हे गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. या आधीही त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. घरचे जेवण, श्वास घेण्यासाठी उपकरण आणि झोपण्यासाठी गादी मिळावे, अशी विनंती यापूर्वी भुजबळ यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यांना पोलिस बंदोबस्तात रुग्णालयात आणण्यात आले.

Web Title: mumbai news chhagan bhujbal hospital sickness