सरन्यायाधीशांनी राजीनामा द्यावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर सरन्यायाधीशांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रशासकीय आयोग बार असोसिएशनने केली आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपतींकडे याबाबत निवेदन पाठवले आहे. चार न्यायमूर्तींनी न्यायव्यवस्थेबाबतच्या मांडलेल्या परिस्थितीमुळे सरन्यायाधीशांच्या कामाबाबत शंका निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
Web Title: mumbai news The Chief Justice should resign