उलवे टेकडीवरील स्फोटांचा परिणाम नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - उलवे टेकडीच्या सपाटीकरणासाठी सुरू असलेल्या स्फोटांचा दूरवरच्या परिसरात परिणाम होत नाही, असे स्पष्टीकरण सिडकोने दिले आहे. टेकडीवर होत असलेल्या स्फोटांमुळे घरांना तडे गेल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ‘सकाळ’कडे केल्या होत्या; परंतु टेकडीवर अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने व तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली स्फोट घडवून आणले जात असून, त्याचे परिणाम होत नाही, असे सिडकोने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

विमानतळाच्या विकासपूर्व कामांमध्ये उलवे टेकडी सपाटीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. टेकडी सपाट करण्यासाठी डोंगरावर स्फोटांची मालिका सुरू आहे. दररोजच्या या स्फोटांमुळे घरांना तडे गेल्याच्या तक्रारी उलवे टेकडीच्या परिसरातील रहिवाशांनी केल्या आहेत. वरचे ओवळे व तरघर येथील ग्रामस्थांनी घराला तडे गेल्याची छायाचित्रे दाखवली होती. उलवे टेकडी सपाटीकरणासाठी मेसर्स डी. जे. बेल्हेकर या कंत्राटदाराची सिडकोने नियुक्ती केली आहे. संबंधित कंत्राटदाराकडून डोंगराच्या सपाटीकरणाचे ८० टक्के काम विनातक्रार पूर्ण झाले आहे. यासाठी रीतसर पूर्वपरवानग्या घेतल्या असून जॉईंट चीफ कंट्रोलर व खनिकर्म परवाना पोलिस आयुक्त यांनी तपासणी केली आहे. स्फोट घडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्थान धनबाद झारखंड यांची सल्लागार नेमणूक केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्फोटांचे काम सुरू आहे. आतापर्यंत केलेले स्फोट सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा परिस्थितीत स्फोटांमुळे घरांना तडे जाण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे सिडकोने म्हटले आहे.

Web Title: mumbai news cidco