अहवालापूर्वीच स्वतःच्या चौकशीला क्‍लीन चिट

अहवालापूर्वीच स्वतःच्या चौकशीला क्‍लीन चिट

मुंबई - शेतकऱ्यांच्या तक्रारींवर बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरकारभाराची पणनमंत्री सुभाष देशमुखांनी 40 ब अंतर्गत चौकशी लावली होती. मात्र, त्या चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अधिकारात नसतानाही या चौकशीला स्थगिती दिली. यावर कळस म्हणजे राज्यमंत्र्याच्या या स्थगितीचा संदर्भ घेऊन अधिकाऱ्यांनीही टिपण तयार केले आणि स्वतःच लावलेल्या चौकशीला सुभाष देशमुख यांनी चौकशी अहवाल येण्यापूर्वीच स्थगिती दिली. त्यामुळे दोन्ही मंत्री या बाजार समितीवर एवढे मेहरबान का झाले आहेत? आणि मंत्र्यांनी लावलेल्या चौकशीला राज्यमंत्र्यांनी स्थगिती कशी काय दिली, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सुभाष कदम, हरीभाऊ सिनकर आणि गोकुलसिंग कवाळ या शेतकऱ्यांनी केली होती. त्यांच्या तक्रारींची दखल घेत देशमुख यांनीही चौकशीचा आदेश दिला. हे प्रकरण सहनिबंधक अमरावती यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्यामुळे याविरोधात फक्त उच्च न्यायालयातच दाद मागता येते. असे असताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोणत्याही न्यायिक व कायदेशीर बाबी न तपासता बाजार समिती सभापतीच्या पत्रावरच स्थगिती आदेश दिला आहे; पण त्यांना आदेश देण्याचा अधिकारच नसल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्यांनी केला आहे.

जशी मागणी येते, तशा प्रकारे मी कारवाई केली आहे. बाकी माहिती घेऊन सांगतो.
- सुभाष देशमुख - सहकार व पणनमंत्री

लोक भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या त्या निवेदनावर नेहमीप्रमाणे मी रिमार्क दिला आहे; पण यामध्ये मंत्र्यांनीही स्थगिती दिली आहे. त्यामुळे माझा काय विषयच येत नाही.
- सदाभाऊ खोत- पणन, राज्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com