पेट्रोलचोरी रोखण्यासाठी संगणकीय 'डिस्पेंन्सिंग युनिट'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई - पेट्रोल व डिझेल चोरी रोखण्यासाठी पेट्रोल पंपावरील "डिस्पेंन्सिंग युनिट' संगणकाला जोडण्याची सक्‍ती केली जाणार आहे. पंपावरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये छेडछाड करणाऱ्या राज्यातील एक हजार पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली.

राज्यात पेट्रोल व डिझेल डिस्पेन्सिंग युनिटमध्ये छेडछाड करून पेट्रोल व डिझेल चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजनांबबत माहिती देताना बापट म्हणाले, 'पेट्रोल पंपावरील वितरण व्यवस्था पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावरील डिस्पेंन्सिंग युनिटशी संबंधित सॉप्टवेअर व हॉर्डवेअरची तपासणी करून त्याचे ऑडिट करून ऑइल कंपन्यांवरही जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी आपल्या विभागाने पुढाकार घेतला आहे. हा ऑडिट रिपोर्ट घेताना डिस्पेन्सिंग युनिटशी संबंधित संपूर्ण माहितीचा समावेश होणार असल्याने त्यामध्ये फेरफार करण्याचे प्रमाण नगण्य आहे. संगणकीय डिस्पेन्सिंग युनिट बसवण्यासाठीच्या सूचना पेट्रोल पंपधारकांना पाठविण्यात आल्या आहेत.''

या ऑडिट रिपोर्टवर तेल कंपन्यांचे प्रतिनिधी, डिस्पेन्सिंग युनिटच्या उत्पादकांचे प्रतिनिधी, संबंधित पेट्रोल पंपाचे वितरक या तीनही जबाबदार प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. त्यानंतरच डिस्पेन्सिंग युनिटचे दरवर्षी कॅलिब्रेशन करून स्टॅम्पिंग करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. याच पद्धतीने ऑडिट रिपोर्ट करणे बंधनकारक करण्यात आल्याचेही बापट यांनी सांगितले.

Web Title: mumbai news computerised despending unit control for petrol theft