नगरसेवकांची आज 'मातोश्री'वर झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

मुंबई - महापालिकेत पावलोपावली भाजप शिवसेनेची कोंडी करीत असून, पक्षांतर्गतही धुसफूस वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगरसेवकांची स्वत: झाडाझडती घेणार आहेत. "मातोश्री'वर शनिवारी (ता.17) सकाळी 11 वाजता नगरसेवकांची बैठक होणार आहे.

शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत फार मोठा फरक नाही. त्यामुळे प्रत्येक पावलावर भाजप शिवसेनेला अडचणीत आणत आहे. शिवसेनेचे अनेक प्रस्ताव भाजपमुळे रखडले आहेत. भाजप आक्रमक भूमिका घेत असताना शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढली आहे.

पालिकेतील नेत्यांमध्येच संवाद नसल्याने अनेक वेळा स्थायी समितीत शिवसेनेची अडचण होते. अशा तक्रारी "मातोश्री'वर आल्या आहेत. हा अंतर्गत कलह पक्षाला अडचणीत आणणारा असल्याने ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news corporator meeting on matoshri